आमची यशोगाथा
ग्रामपंचायत दात्याणे, निफाड – निसर्गाच्या कुशीतलं एक जिवंत चित्र
नाशिक - ओझर - कसबे सुकेणे मार्गाच्या गडद रेषेपासून थोडं पूर्वेकडे वळलं, की तिथं साक्षात निसर्गाचं एक अव्यक्त सुंदर रुप भेटतं दात्याने गावात सुमारे ३६७ लोकवस्तीचं हे गाव बाणगंगा नदीच्या काठावर निवांतपणे विसावलेलं आहे. गावाचं स्वरूप लहान, पण त्याची ओळख मोठी इथली माणसं, संस्कृती, निसर्ग, सृष्टी आणि श्रम यांचं एक अनोखं संमीलन इथे दिसतं.
गावाची माहिती:- या गावाला दात्याणे हे कसे पडले - राम राज्यामध्ये रावण ज्या वेळस पंचवटी मध्ये सोनेरी हरणाचे रूप घेऊन आलेला होता तेव्हा प्रभू श्रीरामचंद्र त्या हरणाला मारण्याकरिता पंचवटीतून त्या सोनेरी हरणा मागे लागले. प्रभू श्रीरामचंद्र यांनी जेव्हा त्या सोनेरी हरणाला मारले तेव्हा सोनेरी हरणाचे दात या परिसरात पडले होते तेव्हा पासून या गावाला दात्याणे हे नाव पडले आहे.
धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख
दात्याने गावाची एक खासियत म्हणजे खंडेराव महाराज हे ग्रामदैवताचं मंदिर आहे.पण त्या सोबतच गावात महादेव मंदिर, हनुमान मंदिर, म्हसोबा महाराज मंदिर, मरिमाता मंदिर, सप्तशृंगी माता मंदिर हे मंदिरे केवळ धर्माच्या नाहीत, तर सामाजिक समभावाच्या प्रतीक आहेत.२०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या १९२९ इतकी आहे. व या गावात सर्व समाजातील लोक राहतात . उद.- मराठा ,कोळी, भिल्ल ,वंजारी, कोकणी ,न्हावी,सुतार या सामाज्याचे असून ते सर्व गुण्या गोविंदानं, आपुलकीनं, एका छताखाली नांदतात. गावात कोणत्याहि प्रकारचे वाद नाही, तर एकोप्याच्या गोष्टी ऐकायला मिळतात.
उत्पन्नाचे स्रोत: श्रमशीलतेचं गाव
गावकऱ्यांची मुख्य जीवनरेखा म्हणजे शेती आणि मोलमजुरी आहे. गावाचा पूर्व भाग म्हणजे एक बागायती शेताचं स्वप्न,वाघाड कालव्य मुळे इथे शेती भरभराटीला आली आहे. द्राक्ष, भाजीपाला, कांदा, वेलवर्गीय पिकं, यासारख्या पिकांची हिरवळ नजरेत भरते. तर गावाचा पश्चिम भाग मात्र वेगळ्या वाटेवर, तिथं औद्योगिक वसाहत उभी राहत आहे. ही नवी दिशा गावाच्या भविष्याला नवी पहाट देणारी आहे. रोजंदारी, लघुउद्योग, प्रशिक्षण केंद्रं अशी काही स्वप्नं तिथं मूळ धरू लागली आहेत.